श्रीमती मंदाकिनी डगवार (वय ५९ वर्षे) संत होण्यापूर्वी आणि त्यांच्या संत सन्मान सोहळ्याच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार

१. संत होण्यापूर्वी

१ अ. श्रीमती डगवार यांच्याकडे पाहून आत्मीयता वाटणे : ‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर माझी श्रीमती मंदाकिनी डगवार यांच्याशी भेट झाली. त्या वेळी त्यांना पाहिल्यावर मला त्यांच्याविषयी पुष्कळ आत्मीयता वाटत होती आणि ‘त्या आपल्याच झाल्या आहेत’, असा विचार माझ्या मनात आला.

 २. श्रीमती मंदाकिनी डगवार यांच्या संत सन्मान सोहळ्याच्या वेळी त्यांच्या आवाजातील भावप्रयोगाची ध्वनीचकती ऐकतांना

श्रीमती अश्विनी प्रभु

२ अ. ध्वनीचकती ऐकून माझी पुष्कळ भावजागृती झाली.

२ आ. त्या वेळी मला आनंद जाणवत होता.

२ इ. ध्वनीचकती ऐकल्यावर रात्री झोपेतही भावावस्था टिकून रहाणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी पू. डगवारकाकू यांच्या आवाजातील भावप्रयोगाची ध्वनीचकती ऐकल्यावर ‘भावावस्था किती वेळ टिकून रहाते ?’, याचा अभ्यास करण्यास सांगितले. माझी ती स्थिती रात्रीही तशीच होती. मला झोप येत नव्हती. झोपेतही प्रयत्नांचे भावप्रयोगातील शब्द ऐकू येत होते.

या समारंभात सहभागी होण्याची अमूल्य संधी दिल्याबद्दल मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– श्रीमती अश्विनी प्रभु (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), मंगळुरू, कर्नाटक. (११.४.२०२२)

(‘ही सूत्रे पू. मंदाकिनी डगवार संत होण्यापूर्वीची असल्याने त्यांच्या नावाच्या आधी ‘पूज्य’ लावलेले नाही.’ – संकलक)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक