शरिराच्या विविध अंगांनुसार वर्णव्यवस्था !
‘जातीपातीवरून कोणत्याही वर्णाला वेगळे समजले जाऊ नये; कारण हा एक सामाजिक नियम आहे आणि प्रत्येकाचे गुण अन् कर्म यांच्या भेदावर तो आधारित आहेत.
१. ब्राह्मण वर्णाचे स्वरूप
शरिराचा गळ्यापर्यंतचा भाग म्हणजे ईश्वर चिंतन योग ! शरिराच्या सर्व अंगांचे संचालन म्हणजे शरीररूपी समाजाला चालवणे.
२. क्षत्रिय वर्णाचे स्वरूप
हात आणि खांदे म्हणजे रक्षणाचे दायित्व ! प्रत्येक भार सहन करणे आणि प्रत्येक कार्य संपादित करणे.
३. वैश्य वर्णाचे स्वरूप
पोट म्हणजे क्रय-विक्रय यांचे कार्य ! शरिरासाठी भोजनाचे पचन करणे आणि शक्ती मिळवणे.
४. शूद्र वर्णाचे स्वरूप
मनुष्याचे दैनंदिन जीवनक्रम ! सर्व काही वाहून नेणे अर्थात् सतत कार्यरत रहाणे, हे त्याचे कार्य असते. मग रस्ता असो, चिखल असो वा डोंगर. मार्गात काहीही आले, तरी थांबायचे नाही.
५. कार्यानुसार व्यक्तीला ‘अमुक समाजा’चा मानले जाते; मग भेदभाव का करायचा ?
कृषीसंबंधी कार्य करणार्यांना ‘शेतकरी’, असे म्हटले जाते. उत्पादन करणार्या कारखान्यांशी संबंधित कार्य करतात, त्यांना अभियंत्याच्या रूपात ओळखले जातात. त्याच प्रकारे एखादी व्यक्ती जे कार्य करत आहेत, ती त्या समाजाशी संबंधित मानली जाते. (अर्थात् कार्यानुसार व्यक्तीला ‘अमुक समाजा’चा मानले जाते) मग भेदभाव का करायचा ?
६. निसर्गापासून विकसित झालेल्या रिती आणि परंपरा !
‘जगात ३३ कोटी कार्ये आहेत. त्यासाठी ३३ कोटी देवता आहेत’, असे मानण्यात आले आहे. दगड, घर, झाडे, फळे, फुले, पाणी, जीवन, पृथ्वी, अन्न आणि रहाण्याची व्यवस्था, अगदी अग्नि आणि आकाश हे सुद्धा जीवनासाठी अत्यंत उपयोगी तत्त्व आहेत. त्यांच्यामुळे जीवन चालते. त्यांच्यामुळे होणार्या किंवा त्यांच्या सहयोगामुळे होणार्या सर्व कार्यांना आम्ही (हिंदूंनी) देवता मानले आहे; कारण की, ते आम्हाला काही ना काही सतत देत असतात. आमच्याकडून काहीच घेत नाहीत. ही देवाण-घेवाण वैज्ञानिक आधारावरच होते. त्यामुळे निसर्गापासून विकसित झालेल्या रिती आणि परंपरा या आदिकाळापासून चालत आल्या आहेत. यालाच जगाने ‘सनातन’ संबोधले. याला आपण धर्मांधता किंवा रूढीवाद किंवा अप्रगतिशीलता कसे मानावे ? अरे, हा निसर्ग नसेल किंवा आपण त्याला सहकार्य केले नाही, तर हे जीवन कसे चालणार ?’
– रामगोपाल
भगवान श्रीकृष्णासारख्या एका चतुर मार्गदर्शकासाठी भारतभूमी सतत तळमळते आहे !भारत भूमीने प्रत्येक युगामध्ये विरांना जन्म देऊन शौर्यशक्ती कधी अल्प पडू दिली नाही. तसे तर प्रत्येक युगामध्ये नेहमीच एक मोठे युद्ध होत आले आहे. सत्ययुगात देव-दानव, त्रेतायुगात राम-रावण युद्ध, द्वापर युगात महाभारत आणि कलियुगात सुद्धा दोन महायुद्धे झाली आहेत. या युद्धामध्ये विरांनी आपापल्या योग्यतेनुसार शौर्यशक्तींचे उत्तम प्रदर्शन आणि उपयोग केला; परंतु द्वापरयुगात महाभारताने भारत भूमीपासून शस्त्र आणि वस्त्र यांना नष्टच केले आहेत. तसे तर श्रीकृष्णाने महाभारतानंतर जग पुनः वसवले ते जवळ जवळ आपल्या जीवनातील ८० वर्षे हेच कार्य अंगिकारले की, कशा प्रकारे पृथ्वीला शस्त्र अन् शास्त्र यांनी सुसज्जित करावे. श्रीकृष्णाचे वय १२७ वर्ष होते; परंतु त्यांच्या अवतार कार्यानंतर भारतभूमी सतत एका चतुर मार्गदर्शकासाठी तळमळते आहे. – रामगोपाल |
(साभार : मासिक ‘अक्षर प्रभात’, जानेवारी २०२०)