केरळमधील काँग्रेसच्या आमदारावर शिक्षिकेकडून शोषणाचा आरोप
पेराम्बवूर (केरळ) – येथील एका शिक्षिकेने काँग्रेसचे आमदार एलधोस कुन्नापिल्ली यांच्यावर शोषण करण्यात आल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार केली आहे. ‘कुन्नापिल्ली यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी मला ३० लाख रुपये देण्याचा प्रस्ताव ठेवला होता’, असा आरोपही या शिक्षिकेने केला आहे. ‘पोलीस या प्रकरणाचे अन्वेषण करण्यास दिरंगाई करत आहेत’, असा पोलिसांवरही या शिक्षिकेने आरोप केला आहे.
वर्ष २०१६ मध्ये या शिक्षिकेची ओळख या आमदारासमवेत झाली होती. या शिक्षिकेची मैत्रिण आमदाराकडे नोकरी करत होती. त्यातून त्यांची ओळख झाली होती. या शिक्षिकेने आरोप केला आहे की, काँग्रेसवर तिचा विश्वास नाही. काँग्रेस पक्ष आमदाराला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मी एकटी असून माझ्यासाठी लढणारा कुणीच नाही.
Kerala police add non-bailable charges against Congress MLA Eldhose Kunnappilly for sexually assaulting a woman: Detailshttps://t.co/FL0skdwYKM
— OpIndia.com (@OpIndia_com) October 14, 2022
संपादकीय भूमिकाकेरळमध्ये माकप आघाडी सरकार या प्रकरणाचे प्रमाणिकपणे अन्वेषण करण्याची शक्यता अल्प असल्याने महिला संघटना, तसेच महिला आयोग यासाठी या शिक्षिकेला साहाय्य करणार का ? |