उभ्याने पाणी प्यायल्याने खरेच गुडघेदुखी होते का ?
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ७१
‘काही जण म्हणतात की, उभ्याने पाणी प्यायल्याने गुडघ्यांचा संधीवात होतो. हे लोक एखादी व्यक्ती उभ्याने पाणी पितांना दिसली रे दिसली की, तिला एवढ्या आग्रहीपणे हे सूत्र सांगतात की, पाणी पिणारी व्यक्ती भांबावून जाते. ‘उभ्याने पाणी पिणे’, म्हणजे एक महाभयंकर अपराध आहे, अशा स्वरूपाचे ते सांगणे असते. खरेतर ‘उभ्याने पाणी प्यायल्याने संधीवात होतो’, याला काही शास्त्रीय आधार नाही. बसून पाणी पिणे, हे आदर्श असले, तरी ‘उभ्याने पाणी पिणे चुकीचे आहे’, असे म्हणता येत नाही. त्यामुळे उभ्याने पाणी प्यायले, तरी चालू शकते; मात्र बसून किंवा उभे राहून कोणत्याही पद्धतीने पाणी पितांना ते गटागट न पिता शांतपणे प्यावे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१०.२०२२)