(म्हणे) ‘घरी जेवण पोचवायला आम्ही काय ‘झोमॅटो’वाले आहोत का ?’
जिल्हाधिकारी सॅम्युएल पॉल यांच्याकडून पूरग्रस्तांची थट्टा
लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेशातील घागरा नदीला पूर आला असून आंबेडकरनगरमधील स्थानिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशातच तेथील जिल्हाधिकारी सॅम्युएल पॉल यांचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्याकडे काही पूरग्रस्त साहाय्य मागत असल्याचे दिसत आहेत. या वेळी पॉल त्यांना ‘आम्ही घरोघरी जेवण पोचवायला काय ‘झोमॅटो’वाले आहोत का ?’, असा प्रश्न विचारून हाकलून दिल्याचे दिसत आहे. लोकांनी खाद्यपदार्थांची ऑनलाईन मागणी केल्यावर झोमॅटो नावाचे आस्थापन हव्या त्या पत्त्यावर ते पोचवते.
संपादकीय भूमिकाअशा असंवेदनशील जिल्हाधिकार्यांवर कठोर कारवाईच व्हायला हवी , अशीही कुणी मागणी केल्यास त्यात चूक ते काय ? |