केंद्र सरकारने गेल्या ८ वर्षांत रामसेतूला ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करण्याविषयी प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही !
डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिपादन
नवी देहली – गेल्या ८ वर्षांपासून रामसेतूला ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करण्याविषयी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही. त्यामुळे आता न्यायालयानेच सरकारला रामसेतूला ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करण्याचा आदेश देण्यास सांगावे, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात झालेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी केली. त्यावर न्यायालयाने सरकारला या संदर्भात उत्तर देण्याचा आदेश दिला आहे, तसेच याची प्रत डॉ. स्वामी यांनी देण्यासही सांगितले आहे.
सुप्रीम कोर्ट में मोदी सरकार पर बरसे सुब्रमण्यम स्वामी, बोले- रामसेतु पर 8 साल में एक हलफनामा तक नहींhttps://t.co/QC7cte9Ci8
— Subramanian Swamy (@Swamy39) October 13, 2022