फाळणीमुळे देशाबाहेर गेलेल्या शक्तीकेंद्रांना पुन्हा भारतात आणायचे आहे ! – रामेश्‍वर शर्मा, आमदार, भाजप, मध्यप्रदेश

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे ‘हिंदु धर्मसेना’ आयोजित हिंदु धर्मजागृती सभा !

जबलपूर – बांगलादेशातील ढाका शहरात ‘ढाकेश्‍वरी’ हे शक्तीपीठ आहे. लाहोर लव-कुश यांचे शहर आहे. देशाच्या फाळणीमुळे भारताबाहेर गेलेल्या या शक्तीकेंद्रांना पुन्हा भारतात आणायचे आहे, असे प्रतिपादन भाजपचे नेते तथा आमदार श्री. रामेश्‍वर शर्मा यांनी केले. ते येथील काली माई मंदिर परिसरात हिंदु धर्मसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेला संबोधित करत होते.

व्यासपीठावर डावीकडून श्री. आनंद जाखोटिया, श्री. योगेश अग्रवाल, आमदार श्री. रामेश्‍वर शर्मा, आमदार श्री. अजय बिश्‍नोई, श्री. अनिल तिवारी, सौ. लता ठाकूर

या वेळी हिंदु धर्मसेनेचे संस्थापक श्री. योगेश अग्रवाल म्हणाले की, शस्त्रपूजा आपली प्राचीन सनातन परंपरा आहे. ही विद्या शिकणे आणि स्वसंरक्षणासाठी त्याचा उपयोग करणे आवश्यक आहे.

लोकप्रतिनिधी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी केलेले उद्बोधन

१. श्री. अजय बिश्‍नोई, आमदार, भाजप – हिंदु धर्म एक मात्र वैज्ञानिक धर्म आहे. आमच्या तिथी, पंचांग, कालगणना या अत्यंत शास्त्रीय आहे. भविष्यात ग्रहस्थिती कशी असेल, हे या पंचांगावरून आज सांगता येते. ही वैज्ञानिक परंपरा आपण पुढे नेली पाहिजे.

२. डॉ. जितेंद्र जामदार, उपाध्यक्ष, मध्यप्रदेश जनअभियान परिषद – देश आणि धर्म विरोधी शक्तींच्या विरोधात हिंदूंना संघटित व्हायला हवे.

३. सौ. लतासिंह ठाकूर, अध्यक्षा, चंडी वाहिनी – सध्याची परिस्थिती पहाता युवतींनी लव्ह जिहादला बळी न पडता स्वसंरक्षणासाठी तत्पर असायला हवे.

४. श्री. अनिल तिवारी, विवेकानंद युनिव्हर्सिटी – अहिंसा हे थोतांड आहे. अहिंसेचे धडे देऊन आपल्यातील शौर्य नष्ट करण्यात आले. आत्मरक्षणासाठी आपण तत्पर असायला हवे.

सभेला उपस्थित जनसमुदाय

भक्तीसह शक्तीची उपासना करणे काळाची आवश्यकता ! – आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

श्री. आनंद जाखोटिया

असुरांच्या संहारासाठी श्री दुर्गादेवी प्रकट झाली आहे. तिच्या सर्व हातांमध्ये शस्त्र आहेत. आज भक्तीसह शक्तीची उपासना करणे काळाची आवश्यकता आहे. या नवदुर्गेला युवतींनी मनामध्ये धारण केले, तर लव्ह जिहादींची हिंदु मुलींकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे धाडस होणार नाही. आज युवतींनी दांडियासह दंडही हातात धरायला हवा. हिंदूंसमोर अनेक समस्या आणि मागण्या आहेत; पण आता वेळ थोडा आहे. या समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी ‘भारत हिंदु राष्ट्र म्हणून घोषित व्हायला हवा’, ही मागणी लावून धरली, तर सर्व समस्यांचे निराकरण निश्‍चित होईल.

________________________________