भाऊबिजेच्या निमित्ताने बहिणीला चिरंतन ज्ञानामृत असलेले सनातन संस्थेचे ग्रंथ देऊन, तसेच राष्ट्र-धर्म यांच्याप्रती अभिमान वाढवणार्या ‘सनातन प्रभात’ची वाचिका बनवून अनोखी ओवाळणी द्या !
भाऊबिजेनिमित्त सर्वत्रच्या हिंदु बांधवांना आवाहन !
१. भाऊबीज आणि त्या निमित्ताने दिली जाणारी ओवाळणी !
कार्तिक शुक्ल द्वितीया, म्हणजेच भाऊबीज किंवा यमद्वितीया ! या वर्षी २६.१०.२०२२ या दिवशी भाऊबीज असून हिंदु संस्कृतीनुसार या दिवसाला महत्त्व आहे. या दिवशी भाऊ बहिणीकडे भोजनासाठी जातो. ‘भावाने आपले रक्षण करावे’, यासाठी ती भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी देतो. या निमित्ताने बहिणीला वैविध्यपूर्ण ओवाळणी देण्याची पद्धत आहे. बर्याचदा भाऊ बहिणीला नवी वस्त्रे, अलंकार आदी भेट देतात, तर काही जण रोख रक्कमही देतात.
२. सध्याच्या काळानुसार श्रेष्ठ ओवाळणी !
भाऊबिजेच्या दिनी आपल्या बहिणीला वरील अशाश्वत भेटवस्तू देण्यापेक्षा चिरंतन ज्ञानाचा प्रसार करणार्या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथ भेट देता येतील. त्याचप्रमाणे तिला ‘सनातन प्रभात’ या नियतकालिकाची वाचिकाही बनवता येईल. सध्याच्या काळानुसार ही भेट देणे अधिक सयुक्तिक ठरेल.
३. सहजसोप्या भाषेत धर्मशास्त्र सांगून धर्माप्रती श्रद्धा वाढवणारे सनातनचे ग्रंथ !
सनातन संस्थेने सप्टेंबर २०२२ पर्यंत अध्यात्म, साधना, देवतांची उपासना, आचारधर्म, बालसंस्कार, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आदी विषयांवरील ३५७ ग्रंथ आणि लघुग्रंथ यांच्या मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्ल्याळम्, बंगाली, ओडिया, आसामी आणि गुरुमुखी या भारतीय, तर इंग्रजी, सर्बियन, जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच आणि नेपाळी या विदेशी भाषांत ९० लाखांहून अधिक प्रती प्रकाशित केल्या आहेत. हे ग्रंथ १७ भाषांत उपलब्ध असून ते वाचकांना ‘काळानुसार आवश्यक साधना कोणती ? देवतांची उपासना कशी करावी ? धार्मिक उत्सव कसे साजरे करावेत ?’ आदी विषयांवरील अमूल्य ज्ञान सहजसोप्या भाषेत देतात. त्यामुळे ज्यांना भेट देतो, त्यांची धर्माप्रती श्रद्धा वाढते.
४. साधनेचे महत्त्व बिंबवणारे आणि प्रतिकूल प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी स्त्रियांमध्ये मनोधैर्य निर्माण करणारे ‘सनातन प्रभात’ !
सध्या सामाजिक परिस्थिती बिकट असल्याने स्त्रियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना या समस्यांविषयी अवगत करून सतर्क करणे, ही काळाची आवश्यकता आहे. ‘सनातन प्रभात’ अविरतपणे हे समाजोपयोगी कार्य करत आहे. स्वरक्षणासाठी उद्युक्त करणारे, तसेच ‘साधनेचा आधार घेऊन प्रतिकूल प्रसंगांना सामोरे कसे जायचे ?’ यांविषयीची उपयुक्त माहिती देणारे लेख या नियतकालिकात नियमित प्रसिद्ध केले जातात. त्यामुळे कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे मनोधैर्य स्त्रियांमध्ये निर्माण होऊ लागते.
भगिनीच्या मनावर साधनेचे महत्त्व बिंबवून तिला जीवनात आमूलाग्र पालट करणार्या ‘सनातन प्रभात’ची वाचिका बनवणे आणि त्यातील अमूल्य माहिती वाचण्यास प्रवृत्त करणे, यांपेक्षा अन्य श्रेष्ठ ओवाळणी कोणती असेल ?
बहिणीला देण्यासाठी सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ हवे असल्यास त्यांची मागणी स्थानिक वितरकांकडे करता येईल. तिला ‘सनातन प्रभात’ची वाचिका बनवण्यासाठी www.SanatanPrabhat.org/subscribe/ ही मार्गिका (लिंक) पहावी वा स्थानिक साधकांना संपर्क करावा. (२८.९.२०२२)