देवतांची चित्रे असणार्या फटाक्यांवर बंदी घालण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची निवेदनाद्वारे मागणी !
कराड (जिल्हा सातारा), १३ ऑक्टोबर (वार्ता.) – दिवाळी तसेच अन्य वेळी हिंदु देवतांची चित्रे असणारे फटाके ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्री केले जातात. असे फटाके फोडल्यानंतर त्यावरील देवतेच्या चित्राच्या चिंधड्या होतात. यातून देवतांचा घोर अवमान होऊन हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे हिंदूंच्या श्रद्धा आणि धार्मिक भावना लक्षात घेऊन अशा फटाक्यांची विक्री होऊ नये, यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी, अशा मागणीचे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रांताधिकारी उत्तम दिघे, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील, कराड शहर उपविभागीय पोलीस अधीक्षक उदय बाळासाहेब दळवी आणि कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना देण्यात आले.
या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाहक श्री. सागर आमले, हिंदु एकता आंदोलनचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर, भाजपचे शहराध्यक्ष श्री. एकनाथ बागडी, धर्मजागरण समन्वयक श्री. गणेश महामुनी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मदन सावंत, श्री. मनोहर जाधव, श्री. अनिल कडणे, हिंदु तेज संघटनेचे श्री. गणेश कापसे यांसह धारकरी सर्वश्री अनिल खुंटाळे, श्रीकृष्ण पाटील, ऋषिकेश पाटील, विराज बोराटे, अजिंक्य डकरे आणि विश्वजीत देसाई उपस्थित होते.