गुरुग्राम (हरियाणा) येथे जमावाकडून मशिदीवर आक्रमण
गुरुग्राम (हरियाणा) – येथील भोरा कलान परिसरातील एका मशिदीवर स्थानिक जमावाने आक्रमण केले. जमावाने काही जणांना मारहाण केली आणि नमाजपठण करणार्यांना ठार मारण्याची धमकी दिली. तसेच येथे तोडफोड केली. नंतर आरोपींनी मशिदीचे प्रवेशद्वार बंद करून पळ काढला.
गुरुग्राम की मस्जिद में घुसकर नमाज अदा कर रहे लोगों की पिटाई, पुलिस बोली- गेट बंद कर भागे उपद्रवी
https://t.co/MlUF7nwE4N— Jansatta (@Jansatta) October 13, 2022
या प्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी १२ लोकांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. आक्रमणकर्त्यांचा हेतू काय होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे पोलिसांनी सांगितले. तक्रारदार नझर अहमद यांनी सांगितले की, आक्रमणकर्त्यांनी मुसलमानांना हा परिसर सोडण्याची धमकी दिली आहे, असा दावा त्यांनी केला.