मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंतर्वस्त्रामध्ये सोने लपवल्याप्रकरणी दोघांना अटक
इस्लामी राष्ट्रांतून तस्करी करणारे धर्मांध प्रवासी !
मुंबई – अंतर्वस्त्रामध्ये सोने लपवल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. एअर इंटेलिजन्स युनिटने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई केली. या सोन्याची किंमत १ कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. आरोपींमध्ये नईमा अहमद उल्दय (वय ६२ वर्षे) आणि रज्जद नोरे याला अटक करण्यात आली आहे.
नईमा अहमद उल्दय या मुंबईतील रहाणार्या असून दुबईतून त्या मुंबईत आल्या होत्या. १ किलो २९० ग्रॅम सोन्याची पावडर त्यांनी अंतर्वस्त्रामध्ये लपवली होती. त्याची किंमत ६३ लाख २० सहस्र आहे. रत्नागिरी येथील रज्जद नोरे याच्याकडे १ किलो २८४ ग्रॅम इतकी सोन्याची पावडर आढळून आली. त्याची किंमत ६२ लाख ८८ सहस्र असण्याची शक्यता आहे. दोघांच्या अटकेतून एक कोटी ३० सहस्रांपेक्षा अधिक किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे.