कर्जासाठी बनावट शिक्का मारून आणि स्वाक्षरी करून ग्रामपंचायतीची फसवणूक करणार्यांवर गुन्हा नोंद !
कोल्हापूर – कर्जासाठी बनावट शिक्का मारून आणि स्वाक्षरी करून केर्ली (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीची फसवणूक केल्याप्रकरणी मुलगा अन् वडील यांच्यावर करवीर पोलिसात गुन्हा नोंद केला आहे. विजयमाला यांच्या तक्रारीनुसार आनंदा मिरजकर आणि प्रदीप मिरजकर अशा दोघा संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
‘जनविकास फायनान्स’कडून कर्ज मिळवण्यासाठी आनंदा आणि प्रदीप यांनी केर्ली गावाच्या हद्दीत ‘७०८ मिळकत सीटी सर्व्हे’ झाला नसून तारण गहाणखत सिद्ध करण्यास ग्रामपंचायतीची कोणतीही हरकत नसल्याच्या दाखल्यासाठी ग्रामपंचायतीचे बनावट ‘लेटरहेड’ सिद्ध केले. तक्रारदार विजयमाला चौगुले आणि ग्रामसेविका आशा घुगे यांच्या नावाचा बनावट शिक्का सिद्ध केला. त्यावर चौगुले आणि घुगे यांच्या खोट्या स्वाक्षर्या करून सिद्ध केलेला दाखला ‘जनविकास फायनान्स’च्या कर्ज प्रकरणासाठी जोडून ग्रामपंचायतीची फसवणूक केली.
संपादकीय भूमिकाफसवणूक करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, हे समाजासाठी घातक आहे. फसवणूक करणार्यांना कठोर शिक्षाच हवी. समाजाची नीतिमत्ता वाढण्यासाठी धर्मशिक्षणच द्यायला हवे. |