ठाणे जिल्ह्यात अवैधरित्या वाळूउपसा करणार्यांवर कारवाई !
२१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
ठाणे, १२ ऑक्टोबर (वार्ता.) – जिल्ह्यातील खाडी आणि नदी येथे रेती माफियांकडून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैधरित्या उत्खनन करण्यात येते. त्याविषयी केलेल्या तक्रारींची नोंद घेत जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या साहाय्याने ही धडक कारवाई ११ ऑक्टोबर या दिवशी केली. अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये यांच्या निर्देशानुसार पथकाने खासगी बोटीच्या साहाय्याने मोठागाव बंदर येथून कारवाईला प्रारंभ करून कोपर आणि दिवा खाडीमध्ये ३ सक्शन पंप पाण्यामध्ये बुडवल्याचा दावा केला आहे. येथील बार्ज (तराफा) जाळण्यात आले. जिल्हा दक्षता पथक, रेतीगट शाखा, कल्याण येथील तहसीलदार, तलाठी, बारावे, टिटवाळा येथील यंत्रणेने २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ६ बार्ज जाळण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.