साधिका कुठेही असली, तरी ‘परात्पर गुरुदेव सूक्ष्मातून सतत समवेत आहेत’, असे तिला जाणवणे आणि तिचे मन ‘गुरुदेव अन् स्वतःची साधना’, यांवरच केंद्रित असणे

अनुभूतींच्या माध्यमातून साधकांना आनंद देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
श्रीमती शीला करंडे

‘मी कुठेही गेले असेल, तरीही ‘परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्या समवेत आहेत’, असे मला जाणवते. केवळ ‘माझे गुरुदेव, मी आणि माझी साधना’, यांवरच माझे लक्ष केंद्रित असते. ‘माझे लक्ष दुसरीकडे जात नाही’, ही केवळ गुरुदेवांची कृपा आहे. त्यामुळे मला पुष्कळ आनंद मिळतो. काही जण मला विचारतात, ‘‘काकू, तुम्ही एवढ्या लांब एकट्या कशा जाता ?’’ तेव्हा मी त्यांना सांगते, ‘‘माझी गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉक्टर) मला एकटे ठेवत नाही. ते सतत माझ्या समवेत असतात. गुरुदेव माझ्या पुढे असतात आणि मी त्यांच्या मागे असते.’’

– श्रीमती शीला करंडे (आताची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६३ वर्षे), वणी, जिल्हा यवतमाळ. (४.१०.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक