शरद ऋतूत निरोगी रहाण्यासाठी हे करा !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ६९

वैद्य मेघराज पराडकर

‘पावसाळा संपून थंडीचे दिवस चालू होईपर्यंत शरद ऋतू असतो. सध्या शरद ऋतू चालू आहे. या काळात निरोगी रहाण्यासाठी पुढील कृती कराव्यात.

१. ४ वेळा न खाता २ किंवा ३ वेळा आहार घ्यावा.
२. तिखट, चटपटीत आणि तळलेले पदार्थ खाणे टाळावे.
३. तेलाचा वापर मर्यादित प्रमाणात करावा.
४. दिवाळीपर्यंत दही खाऊ नये (ताक चालते).
५. दुपारचे कडक ऊन टाळावे.
६. दुपारी झोपू नये. झोप आवरतच नसल्यास १५ ते २० मिनिटेच झोप घ्यावी.

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१०.२०२२)