(म्हणे) ‘मंदिरात महिलांचे शोषण केले जाते !’
आम आदमी पक्षाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांचे संतापजनक विधान
कर्णावती (गुजरात) – आम आदमी पक्षाचे गुजरात राज्याचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांनी ‘मंदिरात, तसेच प्रवचनाला महिलांनी जाऊ नये, तेथे त्यांचे शोषण केले जाते’, असे विधान केले. भाजपचे सामाजिक माध्यम प्रमुख अमित मालवीय यांनी त्यांच्या टि्वटर खात्यावर गोपाल इटालिया यांच्या या विधानाचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. यापूर्वी इटालिया यांनी पंतप्रधान मोदी यांना ‘नीच’ म्हटले होते, तसेच हिंदूंच्या देवतांविषयीही आक्षेपार्ह विधाने केली होती.
‘Temples are places of exploitation’: AAP Gujarat President Gopal Italia’s hate-filled video from 2018 goes viralhttps://t.co/TrUXxh7mHN
— OpIndia.com (@OpIndia_com) October 11, 2022
या व्हिडिओत गोपाल इटालिया हे हरिमोहन धवन आणि अरुण कुमार यांचे एक पुस्तक दाखवत आहेत. त्या वेळी ते म्हणत आहेत ‘मी माझ्या माता आणि भगिनी यांना विनंती करतो की, मंदिरात आणि प्रवचनला जाऊ नका. तेथे जाऊन तुम्हाला काहीही मिळणार नाही. ही महिलांची शोषण करणारी ठिकाणे आहेत. तुम्हाला जर तुमचे हक्क हवे असतील, तसेच तुम्हाला या देशावर राज्य करायचे असेल, तर प्रवचनात नाचण्यापेक्षा हे पुस्तक वाचा’, असे आवाहन गोपाल इटालिया करत आहेत.
संपादकीय भूमिका
|