बेंगळुरूमध्ये अकबरूद्दीन ओवैसी यांच्या हिंदूंना धडा शिकवण्याच्या विधानावर मुसलमानांचा तलावारीसह नाच !
व्हिडिओ प्रसारित झाल्यावर पोलिसांकडून १४ अल्पवयीन मुलांसह १९ मुसलमानांना अटक !
बेंगळुरू (कर्नाटक) – येथील ‘टँक गार्डन’जवळ मुसलमानांनी पैगंबरांच्या जन्मोत्सवानिमित्त मिरवणूक काढली होती. या वेळी एम्.आय.एम्. पक्षाचे नेते अकबरूद्दीन ओवैसी यांच्या हिंदूंच्या विरोधातील जुन्या भाषणांवर आधारित संगीताच्या तालावर तलवार घेऊन नाचत होते. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर पोलिसांनी १४ अल्पवयीन मुलांसह १९ मुसलमानांना अटक केली. सुमारे एक घंटा हा नाच चालू होता; मात्र पोलिसांना याची कोणतीही माहिती नव्हती, असे समोर आले आहे. (झोपलेले पोलीस ! – संपादक)
— Mangalorean (@MangaloreanNEWS) October 11, 2022
या मुसलमानांपैकीच एकाने या नाचाचा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्रामवरील ‘अपना इलाका’ या खात्यावर प्रसारित केल्यावर याची माहिती पोलिसांना मिळाली. अकबरुद्दीन ओवैसी यांनी काही वर्षांपूर्वी त्यांच्या भाषणात ‘पोलिसांना १५ मिनिटांसाठी बाजूला केल्यास आम्ही १०० कोटी हिंदूंना धडा शिकवू’ असे चिथावणीखोर विधान केले होते. त्यांचे हेच वक्तव्य ‘डिजे’च्या (मोठ्या संगीत यंत्रणेवर) तालावर वाजवले जात होते.
संपादकीय भूमिका
|