रेल्वेने श्री हनुमान मंदिराला नोटीस बजावून १० दिवसांत मंदिर हटवण्यास सांगितले !
धनबाद (झारखंड) – येथील बेकारबांध संकुलामध्ये असलेल्या रेल्वेच्या जागेवरील श्री हनुमान मंदिराला रेल्वेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. याद्वारे १० दिवसांच्या आत मंदिर रेल्वेच्या भूमीवरून हटवण्यास सांगण्यात आले आहे. पूर्व मध्य रेल्वेच्या साहाय्यक अभियंत्याकडून ही नोटीस मंदिरावर लावण्यात आली आहे. यामुळे स्थानिक लोक संतप्त झाले असून रेल्वेकडून हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी जाणूनबुजून हे कृत्य करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
Jharkhand: Lord Hanuman Gets Notice From Railways in Dhanbad, Asked To Remove Temple Within 10 Dayshttps://t.co/K61vYoAm4n#Jharkhand #LordHanuman #Notice #IndianRailways #Dhanbad @RailMinIndia
— LatestLY (@latestly) October 11, 2022
संपादकीय भूमिका
|