देहू संस्थानचे जुगारी विश्वस्त विशाल मोरे याची हकालपट्टी !
देहु (पुणे) – येथील देहू संस्थानचे जुगारी विश्वस्त विशाल मोरे यांना तीन पत्त्यांचा जुगार खेळतांना पकडले होते. त्यामुळे संस्थानने त्यांची अखेर हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागेसाठी आता निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. यात नाना मोरेंचा एकमेव अर्ज राहिलेला आहे. त्यामुळे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या संस्थानावर त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे.