मनसे महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार !
मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकार्यांची बैठक घेऊन सर्व महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. महानगरपालिका निवडणुकींसाठी त्यांनी ‘सर्व जागा लढण्याची सिद्धता ठेवा’, असे निर्देश दिले आहेत, अशी माहिती मनसेचे सचिव संदीप देशपांडे यांनी दिली.
या मेळाव्यामध्ये ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचा सल्ला दिला आहे. सत्तेचा ‘रिमोट कंट्रोल’ बाळासाहेबांनी नेहमी स्वत:कडे ठेवला. जेव्हा आम्ही सत्तेत येऊ तेव्हा रिमोट कंट्रोल राज ठाकरे यांच्याकडे असेल, असा विश्वास देशपांडे यांनी व्यक्त केला.