सनातन दंतमंजनाचा वापर चालू केल्यावर दाढदुखीचा त्रास दूर होणे आणि दात शिवशिवणे बंद होणे अन् आयुर्वेदिक औषधांचे महत्त्व मनावर कोरले जाणे
‘एक वर्षापासून मला दाढदुखीचा तीव्र त्रास होत होता. पूर्वी ‘रूट कॅनल’ (दाताच्या मुळाशी असलेली पोकळी स्वच्छ करण्याचा उपचार) केलेली माझी दाढ दुखण्याचे कारण नव्हते; परंतु मधून मधून त्या दाढेच्या वरची हिरडी सुजायची आणि दाढेत प्रचंड वेदना व्हायच्या. याव्यतिरिक्त माझे अन्य दातही शिवशिवत होते आणि जबडा आवळल्याप्रमाणे मला त्रास होत होता.
दंतवैद्यांना संपर्क केल्यावर त्यांनी मला पुन्हा ‘रूट कॅनल’ करण्याचा सल्ला दिला; परंतु कोरोना महामारीमुळे सर्वत्रच संकटग्रस्त स्थिती असल्याने मी दंतवैद्यांकडे जाणे टाळले.
त्याच कालावधीत माझ्या मनात ‘सनातन दंतमंजन’ वापरण्याचा विचार आला. अनुमाने १५ दिवस ‘सनातन दंतमंजन’ वापरल्यावर माझे दात शिवशिवणे बंद झाले. माझा जबडा आवळल्याप्रमाणे व्हायचे, तेही बंद झाले.
माझ्या दुखत असलेल्या दाढेवर या १५ दिवसांत २ – ३ वेळा सूज आली. त्या ठिकाणी मी ‘सनातन दंतमंजन’ लावून मालीश केल्यावर सूज ३० मिनिटांत न्यून व्हायची. त्यानंतर प्रयोग म्हणून मी दातांना ‘सनातन दंतमंजन’ औषधासारखे लावून ठेवले आणि ५ ते १० मिनिटांनी दात अन् हिरड्या यांना मालीश करायला आरंभ केला. त्यानंतर दातांतून गरम लाळ बाहेर पडायची. तेव्हापासून माझी दाढदुखी थांबली, तसेच माझे दात शिवशिवणेही बंद झाले.
माझ्या मनावर आयुर्वेदाच्या औषधांचे महत्त्व पुन्हा एकदा कोरले गेले.’
– अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.७.२०२१)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |