नामजप करतांना डोळ्यांसमोर पांढरा शुभ्र प्रकाश दिसणे, नामजपाची अक्षरे क्षितिजाच्या कडेवरून हळुवारपणे क्षितिजाच्या पलीकडे जातांना दिसून भाव जागृत होणे
‘२६.४.२०२२ या दिवशी सकाळी ९.४५ वाजता माझा नामजप एकाग्रतेने होत होता. मला नामजपाची अक्षरे डोळ्यांसमोर दिसून ती हळुवारपणे दिसेनाशी होत होती. एरव्ही मला नामजप करतांना डोळ्यांसमोर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रूप किंवा त्यांचे चरण दिसतात.
मी अनुमाने ४५ मिनिटे नामजप केल्यानंतर मला डोळ्यांसमोर क्षितिजाची कडा दिसली. माझ्या डोळ्यांसमोर पांढरा शुभ्र डोळे दीपवणारा प्रकाश होता. त्या प्रकाशात नामजपाची अक्षरे मला क्षितिजाच्या कडेवरून अगदी हळुवारपणे क्षितिजाच्या पलीकडे जातांना दिसली. मी नामजप करतांना ४ – ५ वेळा असे दृश्य दिसल्यानंतर माझा भाव जागृत झाला आणि नंतर माझा नामजप आणखी चांगल्या पद्धतीने झाला. मी बराच वेळ भावस्थिती अनुभवत होते.’
– सुश्री (कु.) राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.४.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |