भीषण आपत्काळाचा सामना करण्यासाठी साधनेचे बळ निरंतर वाढवण्याची आवश्यकता !
११.१०.२०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात कर्नाटकातील साधक आणि धर्मप्रेमी यांना सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी केलेले मार्गदर्शन पाहिले. पू. रमानंदअण्णांनी साधकांना श्री गुरूंचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व सांगून साधनेची अनिवार्यता साधकांच्या लक्षात आणून दिली. आता आजच्या भागात पू. अण्णांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाचा झालेला लाभ आणि साधक अन् धर्मप्रेमी यांनी व्यक्त केलेले मनोगत पहाणार आहोत.
भाग १ मार्गिका : https://sanatanprabhat.org/marathi/619170.html
(भाग २)
८. साधकांना जाणवलेली सूत्रे
८ अ. सौ. उमा उपाध्ये, कुणिगल, जिल्हा तुमकुर.
८ अ १. कुटुंबातील ३ जणांचे निधन झाले असतांनाही पू. अण्णांचे मार्गदर्शन ऐकल्यावर ‘गुरुदेव माझे रक्षण करतील’, असा आत्मविश्वास वाढणे : ‘पाच दिवसांत माझ्या कुटुंबातील तिघांचे निधन झाल्यामुळे माझ्या मनात पुष्कळ नकारात्मक विचार येत होते. ‘मलाही त्रास होईल का ?’, अशी भीतीही वाटत होती. पू. अण्णांचे मार्गदर्शन ऐकल्यावर मनात सकारात्मकता निर्माण झाली. ‘गुरुदेव माझे रक्षण करतील’, असा विश्वास वाढला. त्याबद्दल गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता.’
८ आ. एक साधक
८ आ १. घरातील तिघांना कोरोनाचा संसर्ग झालेला असतांनाही भीती न्यून होऊन घरी चैतन्य जाणवणे : ‘आमच्या घरी कधीही कुणालाही शारीरिक त्रास झाल्यावर मला भीती वाटून मानसिक ताण येत असे. घरी तिघेजण रुग्णाईत असल्यामुळे त्यांना चाचणीसाठी रुग्णालयात नेले. तेव्हा माझ्या मनावर ताण आला होता. त्या तिघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा वैद्यकीय अहवाल आला; परंतु पू. अण्णांनी मार्गदर्शनात सांगितल्याप्रमाणे प्रयत्न केल्यावर ताण आणि भीती न्यून झाली. घरी चैतन्य जाणवत होते. हे गुरुकृपेनेच शक्य झाले. त्याबद्दल गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता.’
८ इ. सौ. सुनीता, मैसुरू
८ इ १. पू. अण्णांच्या मार्गदर्शनामुळे शारीरिक त्रास चालू झाल्यावर मन विचलित न होणे : ‘पू. अण्णांनी ‘आपत्काळात अथवा कोरोनाच्या संदर्भात भीती वाटल्यास कशा रितीने स्वयंसूचना देऊन त्यातून बाहेर पडायचे ?’, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर एके दिवशी मला ताप, अंग आणि डोके दुखणे असे सर्व चालू झाले; परंतु पू. अण्णांच्या मार्गदर्शनामुळे माझे मन विचलित झाले नाही. हे केवळ गुरुकृपेमुळेच साध्य झाले.’
८ ई. एक साधिका
८ ई १. साधनेला विरोध असतांनाही मार्गदर्शन ऐकतांना अडचण न येणे : ‘माझ्या यजमानांचा साधनेला तीव्र विरोध होता. त्यांना घरी ‘सनातन प्रभात’ आणि सनातनचे ग्रंथ ठेवलेले आवडत नव्हते; परंतु आज गुरुकृपेने मला पू. अण्णांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी कुठलीच अडचण आली नाही. अलीकडे यजमान थोड्या प्रमाणात साधनेला पूरक होत आहेत. ही माझ्यावर गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) केलेली कृपाच आहे.’
८ उ. श्रीमती सुमित्रा
८ उ १. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे गांभीर्य लक्षात येणे : ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया अजून अधिकाधिक श्रद्धेने केली पाहिजे’, असे मला वाटले. ‘आमच्यात असलेला स्वभावदोष आणि अहंरूपी चिखल काढून आम्ही केवळ पुष्प होऊन गुरुचरणी अर्पित व्हावे’, यासाठी गुरुदेवच शतशः प्रयत्न करत आहेत. माझ्या मनात ‘मी गुरुऋण फेडण्यासाठी पुष्कळ न्यून पडत आहे’, असा विचार येऊन मला आतून पश्चात्ताप झाला.’
८ ऊ. सौ. शीला दातार, हनुमंत नगर, बेंगळुरू.
८ ऊ १. ‘वाणीत चैतन्य असल्यावर भाषेला महत्त्व नाही’, हे शिकायला मिळणे : ‘मी अहमदाबाद येथून नुकतीच बेंगळुरू येथे आले आहे. मला कन्नड भाषा अजिबात समजत नाही; परंतु मला पू. अण्णांचे मार्गदर्शन पूर्ण समजले. ते मार्गदर्शन मला लिहूनही घेता आले. त्यावरून ‘वाणीत चैतन्य असेल, तर भाषेला महत्त्व नाही’, हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे मला गुरुदेव आणि पू. अण्णा यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
(क्रमश:)
– सौ. मंजुळा गौडा (पू. रमानंद गौडा यांच्या पत्नी) (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), मंगळूरू, कर्नाटक. (२.६.२०२१)