‘लंपी’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राजू शेट्टी यांची उच्च न्यायालयात याचिका !
मुंबई – गायी आणि अन्य गुरे यांमधील ‘लंपी’ रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार उदासीन असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. या रोगामुळे मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना तातडीने हानीभरपाई देण्यात यावी, याविषयी योजना करून रितसर नियमावली घोषित करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणीही याचिकेतून केली आहे. या रोगामुळे मृत्यूमुखी पडलेल्या दुभत्या गायी किंवा म्हशी यांच्या मालकांना प्रत्येकी दीड लाख रुपये हानीभरपाई देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकासाथीचे आजार रोखण्यासाठी अपयशी ठरलेल्यांना जागे करण्याकरिता जनतेला न्यायालयात धाव घ्यावी लागते, हे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांना लज्जास्पद नव्हे, काय ? |