सामान्य जनतेसाठी नव्हे, तर गांधी कुटुंबाला वाचवण्यासाठी काँग्रेसचा हिंसक सत्याग्रह !
भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या नेत्यांना वाचवण्यासाठी हिंसक आंदोलन करणाऱ्या काँग्रेसवाल्यांचे देशविघातक स्वरूप जाणा !
१. काँग्रेसने हिंसक आंदोलनाला सत्याग्रह म्हणणे हास्यास्पद !
‘बहुचर्चित ‘नॅशनल हेरॉल्ड’च्या भ्रष्टाचारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) तत्परता दाखवून काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची चौकशी केली. त्याचप्रमाणे त्यांच्या मातोश्री आणि काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांनाही चौकशीसाठी बोलावले. या प्रकरणी काँग्रेसच्या काही नेत्यांची यापूर्वीच चौकशी झाली आहे. जेव्हा गांधी परिवाराला चौकशीसाठी समन्स मिळाले, तेव्हा सोनिया गांधी आणि त्यांची मुलगी प्रियांका वाड्रा कोरोना संसर्गाने बाधित झाल्या. त्यानंतर सोनिया गांधी रुग्णालयात भरती झाल्या; पण प्रियांका लवकरच बऱ्या होऊन या चौकशीच्या विरोधात चालवण्यात येणाऱ्या सत्याग्रह आंदोलनात सहभागी झाल्या.
या भ्रष्टाचार प्रकरणी गांधी कुटुंबाची चौकशी करण्याच्या सूत्रावरून काँग्रेसचे नेते रस्त्यावर उतरून गुंडागर्दी करत आहेत आणि अन्वेषण यंत्रणांच्या कामात अडथळे निर्माण करून त्याला ‘सत्याग्रह’ नाव देत आहेत, हे अतिशय हास्यास्पद आहे. आज काँग्रेसचे नेते केवळ गांधी कुटुंबियांची चरणवंदना करण्यातच राजकारण समजतात, हेच यातून स्पष्ट होते. खरे पहाता काँग्रेसचे कथित सत्याग्रह आंदोलन सहस्रो कोटी रुपयांचा घोटाळा दाबण्यासाठी करण्यात येत आहे. राहुल गांधी यांची
३ दिवस चौकशी होत असतांना देशातील विविध भागांत काँग्रेस कार्यकर्त्यांनी ज्याप्रमाणे हिंसाचार आणि वक्तव्ये केली, त्यातूनच पक्षाच्या सत्याग्रहाची पोलखोल झाली. त्यांच्या सत्याग्रहाच्या आंदोलनात सहभागी होणारे सामान्य नागरिक पैसे देऊन बोलावल्याचे समोर आले. आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या लोकांनी हे माध्यमांसमोर मान्य केले आहे.
२. राहुल गांधींचे राजकीय आयुष्य आणि काँग्रेस पक्ष यांना जिवंत ठेवण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन !
राहुल गांधी यांच्या राजकारणाला झळाळी आणण्ो आणि काँग्रेसला जिवंत ठेवण्ो यांसाठी हे राजकीय नाटक चालू आहे. ज्यात कोणतेही तथ्य नाही. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत किंवा कोणत्याही मोठ्या पदावर विराजमान नाहीत. ते केवळ केरळमधील वायनाडचे एक खासदार आहेत. असे असतांना राहुल गांधी चौकशीसाठी जात असतांना त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि भूपेश बघेल त्यांचे कामकाज सोडून देहलीतच तळ ठोकून बसले आहेत. त्यांना त्यांच्या राज्यांची कोणतीही चिंता नाही. राहुल गांधी जेव्हा ‘ईडी’च्या कार्यालयात आत जातात, तेव्हा काही काँग्रेसी नेते त्यांचा प्रामाणिकपणा दाखवण्यासाठी विनाअनुमती आत घुसून ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांवर दबाव आणायचा प्रयत्न करतात. त्यांना बाहेर काढल्यावर तेच बाहेर येऊन केंद्र सरकारवर हुकूमशाहीचा आरोप लावतात. ‘ईडी’च्या कारवाईवर ज्याप्रमाणे काँग्रेसचे नेते गोंधळ घालत आहेत, ते पहाता ‘ईडी’ राहुल गांधींना प्रश्न विचारून फार मोठा गुन्हा करत आहे’, असे वाटते.
दुसरीकडे काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून ‘ईडी’च्या कार्यवाहीत हस्तक्षेप करण्याची मागणी केली, तसेच काँग्रेसचे खासदार विनय तन्खा यांनी केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस काढली. त्यात त्यांनी ‘‘ईडी’च्या चौकशीची अंतर्गत माहिती बाहेर का येत आहे ?’, असा प्रश्न विचारला. तात्पर्य हे की, आज काँग्रेस नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाच्या चौकशीमुळे चिडली आहे आणि त्यांना कसेही करून ही चौकशी थांबवायची आहे की, जे आता अशक्य आहे.
३. काँग्रेसने जनतेसाठी आंदोलन करणे अपेक्षित असतांना गांधी कुटुंबाला वाचवण्यासाठी आंदोलन करणे
जेव्हा गांधी कुटुंबाची चौकशी प्रारंभ झाली, तेव्हापासून सामाजिक माध्यमे (सोशल मिडिया) ते रस्त्यावरील भाषणे इथपर्यंत काँग्रेसी नेत्यांची वाणी अधिकच विषारी बनत चालली आहे. आज काँग्रेस गांधी परिवाराची भक्ती करतांना पंतप्रधान मोदी यांच्या मृत्यूची इच्छा ठेवत आहे, तसेच देशात आग लावण्याची धमकी देत आहे. आज काँग्रेस गांधींजींच्या नावावर देशभर हिंसक आंदोलन करण्यास रस्त्यावर उतरली आहे. काँग्रेसने देशाच्या जनतेसाठी आंदोलन करणे अपेक्षित असतांना ती गांधी कुटुंबाला वाचवण्यासाठी आंदोलन करत आहे आणि तेही हिंसक आहे. हा कसला सत्याग्रह आहे ? काँग्रेसच्या नेत्यांनी तर म. गांधी यांचा इतिहास योग्य प्रकारे वाचला नसावा किंवा तो निवडक वाचला असावा. इतिहासाच्या पुस्तकात दिले आहे की, एकदा गांधीजींच्या सत्याग्रह आंदोलनाच्या वेळी हिंसक घटना घडली होती. तेव्हा त्यांनी त्यांचे आंदोलनच बंद केले होते. त्यांच्या आंदोलनाच्या वेळी कुणाच्याही विरोधात द्वेष पसरवणारे भाषण दिले जात नव्हते. काँग्रेस पक्ष आणि तिचे नेते यांच्या ‘सोशल मिडिया’च्या खात्यावरूनही द्वेषपूर्ण संदेश प्रसारित करण्यात येत आहेत. ते पंतप्रधान मोदी यांना सर्वाधिक लक्ष्य करत आहेत आणि त्यांच्याविषयी अतिशय असभ्य शब्दांचा वापर करत आहेत.
४. काँग्रेसचे आंदोलन म्हणजे केवळ बनावट (खोटे) राजकीय नाटकच !
आज राहुल आणि सोनिया गांधी यांना वाचवण्यासाठी जेवढे लोक रस्त्यावर उतरत आहेत, त्यातील अनेक जण कारागृहात जाऊन आले आहेत किंवा जाण्याच्या सिद्धतेत आहेत. सध्याच्या काँग्रेसमध्ये अशा नेत्यांची मोठी रांग आहे की, जे कारागृहात जाऊन आले आहेत किंवा जाण्याच्या सिद्धतेत आहेत. विशेष म्हणजे हे तेच नेते आहेत की, जे भ्रष्टाचारात अडकलेल्या गांधी परिवाराचे घोटाळे वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत. हा सत्याग्रह केवळ काँग्रेसी युवराजांना (?) परत अध्यक्ष बनवण्यासाठी करण्यात येत असून त्यात काहीही शक्ती नाही. हे आंदोलन म्हणजे केवळ एक बनावट राजकीय नाटक आहे.’
– मृत्युंजय दीक्षित
(साभार : पाक्षिक ‘हिंदु विश्व’) (१४.९.२०२२)
(वाचकांना विनंती : या लेखातील चालू वर्तमानकाळात असलेले प्रसंग लेखाच्या दिनांकाप्रमाणे आहेत. )