पुसद येथील लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांना आळा बसण्यासाठी पोलिसांनी त्वरित कारवाई करावी !
हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून पुसद पोलीस उपविभागीय अधिकार्यांना निवेदन !
पुसद (जिल्हा यवतमाळ) – येथील शहरातील शाळा-महाविद्यालयातील हिंदु मुलींना प्रेमाच्या खोट्या जाळ्यात ओढून त्यांचा लैंगिक छळ करण्यात आला. महाविद्यालयातील व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांची चौकशी केली. तेव्हा विद्यार्थ्यांच्या भ्रमणभाषमधून याविषयीची अधिक माहिती लक्षात आली. महाविद्यालयीन प्रशासनाने या प्रकरणात बर्याच मुली अडकल्याची शक्यता व्यक्त केली आहे. यात धर्मांधांचा समावेश आहे. त्यामुळे पालक आणि हिंदुत्वनिष्ठ संतप्त झाले आहेत. या प्रकरणाची गांभीर्याने नोंद घेत संबंधित धर्मांध युवकांवर गुन्हा नोंद करून सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच शहरातील लव्ह जिहादच्या प्रकारांना आळा बसण्यासाठी ‘दामिनी’ पथकांची निर्मिती करून ठिकठिकाणी धर्मांधांकडून होणारे प्रकार थांबवावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन पुसद पोलीस उपविभागीय अधिकार्यांना देण्यात आले.
या वेळी वाणिज्य श्री गणेश मंडळ मोतीनगर, श्रीरामनवमी उत्सव समिती पुसद, छत्रपती सेना हिंदुस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, मातृभूमी फाउंडेशन पुसद, बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांच्या प्रतिनिधींसह १०० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.