पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे गेल्या ४ वर्षांत पोलिसांवर १७९ आक्रमणे
पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – चालू वर्षात जानेवारी ते ऑगस्ट या ८ मासांमध्ये पोलिसांवर २७ आक्रमणे झाली आहेत. कर्तव्य बजावत असतांना पोलिसांवर झालेल्या आक्रमणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, गेल्या ४ वर्षांत पोलिसांवर वेगवेगळ्या कारणांनी १७९ आक्रमणे झाली आहेत. अन्य सरकारी नोकरांवरील आक्रमणांच्या तुलनेत पोलिसांवरील आक्रमणांचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांचे संरक्षण करण्याचे दायित्व असणार्या पोलिसांवरील वाढती आक्रमणे हा चिंतेचा विषय आहे. हल्ली पोलिसांचा धाक अल्प झाला असून, त्यांच्यावर आक्रमणे करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. वाहतूक पोलिसांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.
संपादकीय भूमिकाजिथे पोलीसच सुरक्षित नसतील, तिथे सामान्य माणसांचे काय ? त्यामुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचकच हवा, तरच अशा घटनांना आळा बसू शकेल. |