राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र येथे ‘सर तन से जुदा’च्या घोषणा !
‘मिलाद-उन-नबी’च्या वेळी धर्मांध मुसलमानांचा हैदोस !
(सर तन से जुदा म्हणजे धडापासून शिर वेगळे करणे)
(‘मिलाद-उन-नबी’ म्हणजे महंमद पैगंबर यांचा जन्मोत्सव)
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – ‘मिलाद-उन-नबी’ या मुसलमानांच्या धार्मिक महोत्सवाच्या दिवशी म्हणजे ९ ऑक्टोबरला देशातील विविध भागांमध्ये ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देण्यात आल्या. यांमध्ये राजस्थानचे जोधपूर आणि उदयपूर, उत्तरप्रदेशातील अमेठी अन् आझमगड, गुजरातमधील ऊना, तसेच मध्यप्रदेश येथील खंडवा आणि महाराष्ट्रातील अमरावती यांचा समावेश आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या विरोधात तीव्र निषेध नोंदवला आहे. पोलिसांनी या विरोधात कारवाई आरंभली आहे.
उत्तरप्रदेश
उत्तरप्रदेशच्या आझमगडमध्ये ‘मिलाद-उन-नबी’च्या वेळी काढलेल्या फेरीमध्ये ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देण्यात आल्या. शहरातील जुन्या कोतवाली क्षेत्रात ही घटना घडली. या वेळी ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणाही देण्यात आल्या. याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत. या घटनेच्या विरोधात पोलिसांनी ३ अल्पवयीन मुलांना कह्यात घेतले आहे. अन्य आरोपींची ओळखही पटवण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मध्यप्रदेश
मध्यप्रदेशच्या खंडवा येथेही ‘सर तन से जुदा’च्या घोषणाबाजीचे व्हिडिओ प्रसारित होत आहेत. या वेळी रस्त्यांवर हिरवे झेंडे फडकावण्यात आले. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी घोषणाबाजी करणार्या ४ युवकांना ९ ऑक्टोबरच्या रात्री अटक केली होती. या कारवाईचा विरोध करण्यासाठी असंख्य मुसलमान महिलांनी पोलीस ठाण्यासमोर जाऊन धरणे आंदोलन करण्यास आरंभ केला. या वेळी शहराचा काजीही (मुसलमान पंथाच्या शास्त्राप्रमाणे निकाल देणारा न्यायाधीश) यामध्ये सहभागी झाला. आंदोलनकर्त्यांच्या दबावाला बळी पडून पोलिसांना मध्यरात्री चारही आरोपींना सोडून द्यावे लागले. या आंदोलनाचा व्हिडिओही सर्वत्र प्रसारित झाला आहे. या घटनाक्रमावर राज्याचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा म्हणाले की, गुन्हा नोंदवण्यात आला असून अन्वेषण चालू करण्यात आले आहे.
गुजरात
गुजरातच्या ऊना येथे झालेल्या मोर्च्याच्या वेळी ‘सर तन से जुदा’ या घोषणा देणार्यांमध्ये काही अल्पवयीन मुलेही असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. धर्मांध मुसलमान येथील पोलीस ठाण्याच्या समोरून जात असल्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
महाराष्ट्र
महाराष्ट्रातील अमरावती येथे तर डीजेवरून ‘सर तन से जुदा’चे गाणेच वाजवल्याचे समोर आले आहे. या वेळी धर्मांध मुसलमान या गाण्यामध्ये सूर मिसळत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. येथेही हिरवे झेंडे हातात घेतलेली अनेक अल्पवयीन मुले दिसत आहेत. येथील भाजपचे राज्यसभेतील खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी म्हटले आहे की, घोषणाबाजी करणारे मुसलमान हे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंधित आहेत.
अशाच प्रकारे उत्तरप्रदेशच्या अमेठी आणि राजस्थानच्या जोधपूर येथेही ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
संपादकीय भूमिका
|