हिंदूंची संपत्ती हडपण्याचा अमर्याद अधिकार असलेला ‘वक्फ कायदा’ रहित करा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
देहलीतील जंतरमंतर येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात करण्यात आली मागणी !
नवी देहली – ज्यांना अल्पसंख्यांक म्हटले जाते, अशांना ‘वक्फ कायदा’ हक्क देतो. तत्कालीन काँग्रेस सरकारने वक्फ कायद्यात दुरुस्ती करून वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार दिले आहेत. मुसलमानांच्या धार्मिक मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी हा कायदा बनवला आहे, असे वरवरचे दिसते; परंतु या कायद्याद्वारे हिंदूंची घरे, दुकाने, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळेच नव्हे, तर सरकारची मालमत्ताही सहज हडप होऊ शकते. देशभरात या कायद्याचा अपवापर होत असलेला हा ‘लँड जिहाद’ (भूमी जिहाद) आहे. हा कायदा धार्मिक भेदभाव करणारा, राज्यघटनाविरोधी असून तो तात्काळ रहित करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केली. येथील जंतरमंतर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले. त्या वेळी त्यांनी वरील मागणी केली. या आंदोलनात हरियाणा राज्यातील जमालपूर येथील श्री. देश यादव, सोनीपत येथील श्री. अजय कुमार आणि अन्य धर्मप्रेमी यांसह समितीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
ब्रिटनमध्ये हिंदूंवर आक्रमण करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करा ! – आंदोलनातील मागणी
ब्रिटनमधील लिसेस्टर शहरात हिंदू समाजाला लक्ष्य करण्याचा नियोजित कुटील प्रयत्न मुसलमान कट्टरतावाद्यांनी चालू केला आहे. हिंदू समाजात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने हिंदूंवर आक्रमणे करण्यात आली. हे आक्रमण करणारे धर्मांध आणि त्यांच्या संघटना, तसेच ब्रिटनच्या शांतताप्रेमी हिंदू समाजाविरोधात खोट्या बातम्या देणारे यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही या आंदोलनात करण्यात आली. |