राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून जम्मू-काश्मीरमध्ये धाडी
आतंकवादाला अर्थपुरवठा केल्याचे प्रकरण
श्रीनगर – आतंकवादाला केल्या जाणार्या अर्थपुरवठ्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) काश्मीरमध्ये धाडी टाकल्या. पुंछ, जम्मू, राजौरी, पुलवामा, श्रीनगर, बडगाम, बांदिपोरा, शोपियां आदी शहरांमध्ये या धाडी टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमधील ‘अल्-हुदा एज्युकेशनल ट्रस्ट’ या संघटनेने सरकारने अनधिकृत संघटना घोषित केलेल्या ‘जमात-ए-इस्लामी’ला अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणी ‘एन्.आय.ए.’ने गुन्हा नोंदवला आहे.
#NIA is carrying out raids at multiple locations in J&K in the terror funding case#NIAraids #terrorfundingcase #JammuAndKashmir https://t.co/4zfBS7bYhx
— Zee News English (@ZeeNewsEnglish) October 11, 2022
संपादकीय भूमिकाआतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना देशद्रोही ठरवून त्यांच्यावर कठोर कारवाई होत नसल्यामुळेच काश्मीरसारख्या ठिकाणी धर्मांध सर्रासपणे आतंकवाद्यांना साहाय्य करतात ! असे कृत्य करण्यास कुणी करू धजावणार नाही, अशी शिक्षा सरकार या राष्ट्रघातकी लोकांना कधी करणार ? |