साजिद खान याला मला ‘बिग बॉस’ कार्यक्रमात घुसून उत्तर द्यायचे आहे ! – अभिनेत्री शार्लिन चोप्रा यांची संतप्त प्रतिक्रिया
|
मुंबई – निर्माता आणि दिग्दर्शक साजिद खान याने मला त्याचे गुप्तांग दाखवून ‘याचे ० ते १० या आकड्यांत मूल्यांकन कर’ असे सांगितले होते. तो आता ‘बिग बॉस’च्या कार्यक्रमात आहे. त्यामुळे मला त्याला बिग बॉसच्या घरात घुसून याचे उत्तर द्यायचे आहे. मला असे वाटते की, संपूर्ण जगाने याचे साक्षी व्हावे, अशा शब्दांत अभिनेत्री शार्लिन चोप्रा यांनी खान यांच्याविषयीचा संताप व्यक्त केला.
He had flashed his private part at me & asked me to rate it on a scale of 0 to 10. I’d like to enter into the house of Big Boss & give him the rating!
Let 🇮🇳 watch how a survivor deals with her molester!Pls take a stand! @BeingSalmanKhan
Read more at: https://t.co/j8kPljB1s6
— Sherlyn Chopra (शर्लिन चोपड़ा)🇮🇳 (@SherlynChopra) October 10, 2022
चोप्रा यांनी १० ऑक्टोबर २०२२ या दिवशी टि्वटरवर एक लेख लिहून ‘हा कार्यक्रम आयोजित करणारे अभिनेते सलमान खान यांनी आता याविषयी भूमिका स्पष्ट करावी’, अशी मागणी केली आहे. ‘जर साजिद खानने सलमान खान यांच्या जवळच्या कुठल्या महिलेशी असा प्रकार केला असता, तर सलमान खान यांनी साजिद खानला ‘बिग बॉस’ कार्यक्रमात घेतले असते का ? साजिद खान याने ज्या महिलांचे लैंगिक शोषण केले आहे, त्यांच्या दुःखाचे काय ?’, असा प्रश्नही चोप्रा यांनी उपस्थित केला आहे.
देहली महिला आयोगाकडून केंद्राला पत्र !
देहली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून ‘साजिद खान याला बिग बॉस या कार्यक्रमातून काढावे’, अशी मागणी केली आहे.
जोपर्यंत आपण अशा माफियांविरुद्ध संघटित होत नाही, तोपर्यंत हे असेच चालत राहील ! – अभिनेत्री शार्लिन चोप्राअशा प्रकारचे आरोप असणार्या अनेकांना चित्रपटसृष्टीत कामे मिळत असल्याविषयीही अभिनेत्री शार्लिन चोप्रा यांनी सडकून टिका केली. त्या म्हणाल्या, ‘‘ही चित्रपटसृष्टी एका माफियाप्रमाणे काम करते. यात बलात्कारी, नशा करणारे, अश्लील कृत्य करणारे, विनयभंग करणारे सर्वांना पुन्हा काम करण्याची संधी मिळते. त्यांना पीडितांविषयी कुठलीही सहानुभूती नसते. जोपर्यंत आपण अशा माफियांविरुद्ध संघटित होत नाही, तोपर्यंत हे असेच चालत राहील.’’ |
संपादकीय भूमिकाखान याच्यावरील गंभीर आरोप पहाता, हा लव्ह जिहादचाच प्रकार असल्याचे कुणीही सांगेल ! अशांवर सरकार आता तरी कठोरात कठोर कारवाई करील का ? |