छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निकटवर्तीय अधिकार्यांच्या घरी ईडीच्या धाडी
रायपूर (छत्तीसगड) – बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणी छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते भूपेश बघेल यांच्या काही निकटवर्तीय अधिकार्यांच्या घरी अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात् ‘ईडी’ने ११ ऑक्टोबरला पहाटे ५ वाजता धाडी टाकल्या. यामध्ये वरिष्ठ सरकारी अधिकारी सौम्या चौरसिया, रायगडच्या (छत्तीसगड) जिल्हाधिकारी रानू साहू, रायपूरमधील कोळासा व्यापारी सूर्यकांत तिवारी, महासमुंद येथील काँग्रेसचे माजी आमदार अग्नी चंद्राकर, खाण विभागाचे प्रमुख जे.पी. मौर्य यांच्यासह रायगडमधील गांजा चौक येथील निवासी नवनीत तिवारी, प्रिंस भाटिया, लेखापरीक्षक सुनील अग्रवाल यांचा समावेश आहे. यापूर्वी यांतील अनेकांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत.
छत्तीसगढ़ में ED की बड़ी कार्रवाई, सीएम भूपेश बघेल के करीबी अफसरों के ठिकानों पर रेड#chhatisgarh#EnforcementDirectoratehttps://t.co/6x1RIqWzKK
— India TV Hindi (@IndiaTVHindi) October 11, 2022
(म्हणे) ‘भाजपकडून अन्वेषण यंत्रणांचा अपवापर !’ – मुख्यमंत्री बघेल
या धाडींविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले, ‘‘भाजप आमच्याशी थेट लढू शकत नाही; म्हणून तो कधी ईडी, तर कधी आयकर विभाग यांचे माध्यम वापरून आमच्याशी लढण्याचा प्रयत्न करत आहे. जसजशा निवडणुका जवळ येतील, तशा या अन्वेषण यंत्रणा पुनःपुन्हा येतील. भाजप यंत्रणांचा अपवापर करत आहे.’’