उत्तरप्रदेशच्या सुल्तानपूरमधील देवीच्या शोभायात्रेवर मशिदीजवळ आक्रमण !
|
सुल्तानपूर (उत्तरप्रदेश) – येथील बल्दीराय क्षेत्रातून हिंदु भाविकांनी देवीच्या मूर्ती विसर्जनासाठी १० ऑक्टोबर या दिवशी शोभायात्रा काढली होती. वलीपूर बाजार येथील मशिदीजवळून शोभायात्रा जात असतांना काही मुसलमान ‘डीजे’ लावल्यावरून वाद घालू लागले. त्यानंतर शोभायात्रेवर दगडफेक चालू झाली. या वेळी ग्रेनेडचा वापरही करण्यात आल्याचे आरोप होत आहेत. या आक्रमणामध्ये घटनास्थळी असलेल्या पोलीस कर्मचार्यांसमवेत १० लोक घायाळ झाले.
या प्रसंगी देवीच्या मूर्तीची तोडफोडही करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेवर ताबा मिळवण्यासाठी अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली. साधारण दीड घंट्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुल्तानपूर येथील पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, आक्रमणकार्यांची ओळख पटली असून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. या घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत.
गोंडा येथे सामाजिक माध्यमांवरील ‘पोस्ट’वरून हिंदु कुटुंबाच्या घरावर आक्रमण !हिंदूंना अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे डोस पाजणारा धर्मनिरपेक्षतावादी चमू हिंदूंवर अशा प्रकारे आक्रमणे झाल्यावर मात्र गप्प का बसतो ? कि हिंदूंच्या विरोधात बोलणे आणि अहिंदूंच्या अत्याचारांकडे कानाडोळा करणे, हीच धर्मनिरपेक्षता आहे ? १० ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या अन्य एका घटनेमध्ये उत्तरप्रदेश राज्यातील गोंडा येथे असलेल्या खरगूपूर भागातील एका हिंदु कुटुंबाच्या घरावर आक्रमण करण्यात आले. सामाजिक माध्यमांवरून करण्यात आलेल्या एका पोस्टचा निषेध नोंदवण्यासाठी काही धर्मांध मुसलमानांनी हे आक्रमण केले. पोस्ट करणार्या रिक्की नावाच्या हिंदु युवकाच्या घरावरच हे आक्रमण करण्यात आले. रिक्कीला अटक करण्यात आली आहे. या वेळी झालेल्या दगडफेकीमध्ये अनेक हिंदूंच्या घरांच्या काचा फोडण्यात आल्या. पोलिसांच्या वाहनांवरही आक्रमण करण्यात आले. रिक्की याच्यावर केलेल्या कारवाईसमवेतच दगडफेक करणार्या धर्मांध मुसलमानांवरही कारवाई करण्यात येत आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून आतापर्यंत १२ धर्मांध मुसलमानांना अटक करण्यात आली आहे. |
संपादकीय भूमिका
|