पाकमधील सिंध प्रांतात अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

१५ दिवसांतील चौथी घटना

इस्लामाबाद – पाकमधील सिंध प्रांतातील हैद्राबाद येथे एका १५ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण करण्यात आले. हिंदु महिलांचे अपहरण होण्याची गेल्या १५ दिवसांतील ही चौथी घटना आहे. यापूर्वी अपहरण केलेल्या तिघा हिंदु महिलांना बलपूर्वक इस्लाम धर्म स्वीकारायला लावला होता. या अल्पवयीन मुलीच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता घरी परत येत असतांना काही लोकांनी तिचे अपहरण केले. त्यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली; परंतु मुलीचा काहीच थांगपत्ता लागला नाही.

संपादकीय भूमिका

  • पाकमध्ये अल्पसंख्य हिंदूंना शिस्तबद्धपणे संपवले जात असतांना भारताने आता तरी कृतीच्या स्तरावर काही करावे, असेच हिंदूंना वाटते !
  • भारतातील अल्पसंख्यांकांवर कथित अत्याचार होत असल्याची ओरड करणार्‍या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पाकमधील अल्पसंख्य हिंदूंवरील भीषण अत्यारांविषयी एकही शब्द का बोलत नाहीत ? सरकारही त्यांना हा प्रश्‍न का विचारत नाही ?
  • पाकसह जगभरातील हिंदूंच्या रक्षणासाठी आता हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !