तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हिंदूंचे सैनिकीकरण व्हायला हवे ! – सुनील देवधर, रा.स्व. संघाचे पूर्वप्रचारक
म्हापसा येथे नववर्ष स्वागत समितीचा भारत व्याख्यानमाला कार्यक्रम
श्री. चेतन राजहंस, सहसंपादक, ‘सनातन प्रभात’
म्हापसा – काळ खूपच वाईट आहे. पालटत्या तंत्रज्ञानाच्या काळात आपण त्याच तंत्रज्ञानाचा वापर हिंदु धर्म पर्यायाने हे राष्ट्र वाचवण्यासाठी केला पाहिजे. सीमेवर लढणारे सैनिकच नव्हे, तर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता प्रत्येक हिंदूचे सैनिकीकरण व्हायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्वप्रचारक श्री. सुनील देवधर यांनी येथे केले.
(सौजन्य : Mapusa Reporter)
येथील नववर्ष स्वागत समितीच्या वतीने गोवा मुक्ती हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भारत व्याख्यानमाला कार्यक्रमात ९ ऑक्टोबरला दुसरे व्याख्यानपुष्प गुंफतांना ते बोलत होते. ‘बलशाली भारत’ हा विषय त्यांना आयोजकांनी दिला होता.
ते पुढे म्हणाले, ‘‘सीमेवरील सैनिकांना त्यांच्या समोरील उघड शत्रूला सामोरे जाणे सोपे असते; परंतु देशांतर्गत कारवाया करून हिंदूंनाच नामोहरम करणार्या कट्टरपंथीयांचा जर सामना करायचा असेल, तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तरे देता आली पाहिजेत. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजेच सामाजिक माध्यमांचा वापर करणे प्रत्येकाने शिकणे आवश्यक आहे. फेसबुक, ट्विटर यांचा सदुपयोग करून प्रत्येकाने देशात जागृती करणे आवश्यक आहे.’’