सातारा येथे चिकनगुनिया आणि डेंग्यू यांच्या रुग्णसंख्येत वाढ !
सातारा – जिल्ह्यात डेंग्यू, चिकनगुनिया या रोगांच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. डेंग्यूचे ३१८, तर चिकनगुनियाचे ३८ रुग्ण आढळून आले आहेत. वातावरणातील पालटांमुळे रुग्णसंख्या वाढल्याचे म्हटले जाते. नागरिकांमध्ये थंडी, ताप, अंगदुखी, सांधेदुखी यांचे प्रमाण वाढत आहे. रुग्णांमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियासदृश लक्षणे आढळून आल्याने आरोग्य आणि हिवताप विभागाकडून गृहभेटीद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. संशयित नागरिकांकडून रक्ताचे नमुनेसुद्धा घेण्यात आले. काही नागरिकांवर खासगी, तर काहींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.