अश्लील व्हिडिओद्वारे फसवणूक करत वृद्धाकडून १८ लाख रुपये लुटले !
मुंबई – विविध प्रकारे धमकावून आणि फसवून वांद्रे येथील ६४ वर्षीय वृद्धाची फसवणूक करण्यात आली आहे. वृद्धाने अपकीर्तीच्या भीतीने १८ लाख रुपये लुटारूंना दिले. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
एका अनोळखी तरुणीने विवस्त्र होऊन या वृद्धाला व्हिडिओ कॉल केला होता. तो प्रसारित करण्याची धमकी देऊन, तसेच विविध कारणे सांगत त्यांच्याकडून पैसे उकळले. अपलोड झालेला व्हिडिओ संकेतस्थळावरून काढण्यासाठीही पैशांची मागणी करण्यात आली; पण वृद्धाने ते देण्यास नकार दिला. तरुणीने अपकीर्ती झाल्याने आत्महत्या केल्याचे खोटे कारण सांगितल्यावर वृद्धाने पुन्हा पैसे दिले. पैशांची मागणी थांबत नसल्याने त्यांनी शेवटी पोलिसांत तक्रार केली.
संपादकीय भूमिकापैशांच्या मागणीला प्रतिसाद न देता सायबर गुन्ह्यांविषयी सतर्कता बाळगा ! |