नामजप करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर काही अंतरावरून प्रकाशरूपात चैतन्याचा स्रोत येतांना दिसणे आणि त्या वेळी संपूर्ण शरिरात गारवा पसरणे
अनुभूतीच्या माध्यमातून सर्वांना आनंद देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘परात्पर गुरु डॉक्टर यांच्या जन्मोत्सवापूर्वी एकदा मी दैनिक ‘सनातन प्रभात’ समोर ठेवून नामजप करत होते. त्या दैनिकात परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांच्या एका बाजूला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि दुसर्या बाजूला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे छायाचित्र होते. काही वेळाने नामजप करतांना माझे मन एकाग्र झाले. मी थोड्याच वेळात डोळे उघडून पाहिले, तर त्या छायाचित्रातील परात्पर गुरु डॉक्टर यांच्या डोक्याच्या काही अंतरावरून प्रकाशरूपात चैतन्यमय स्रोत पाण्याच्या तुषारांच्या वर्षावाप्रमाणे त्यांच्यावर येतांना दिसत होता. हे मला उघड्या डोळ्यांनी पहाता आले. नंतर माझ्या मनात विचार आला, ‘देवाच्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) जन्मोत्सवापूर्वीच त्यांच्यातील चैतन्यात वाढ होत आहे.’ त्या वेळी माझ्या शरिरातील पेशीपेशींत मला थंडावा पसरतांना जाणवत होता; परंतु हा गारवा वेगळाच होता. ‘या स्थितीतून बाहेर येऊच नये’, असे मला वाटत होते. देवाच्या कृपेने देवानेच मला त्याची लीला अनुभवण्यास दिली, यासाठी परात्पर गुरु डॉक्टर यांच्या पावन चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करून शिरसाष्टांग नमस्कार करत आहे.’
– सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.५.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |