निलंगा (लातूर) येथे दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के
लातूर – जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात ९ ऑक्टोबर या दिवशी दिवसभरात दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पहिल्या भूकंपाची तीव्रता २.१ रिश्टर स्केल इतकी होती, तर दुसर्या भूकंपाची तीव्रता १.९ रिश्टर स्केल इतकी होती. मागील मासातही येथे भूकंपाचे धक्के बसले होते. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.