तुर्भे येथे ४ वीजचोरांकडून ६ लाख २९ सहस्र रुपयांची वसुली !
नवी मुंबई, १० ऑक्टोबर (वार्ता.) – ‘महावितरण’च्या भांडुप परिमंडलाच्या अंतर्गत तुर्भे मॅफ्को शाखेच्या पथकाने वीजचोरी करणार्यांवर धाडी टाकल्या. यात ७ जणांची चोरी पकडण्यात आली. त्यांपैकी ४ वीजचोरांकडून ६ लाख २९ सहस्र रुपयांची वसुली करण्यात आली आहे. उर्वरित ३ ग्राहकांवर कारवाईची प्रक्रिया चालू आहे. ‘ग्राहकांनी अधिकृतपणे विजेचा वापर करावा, तसेच वापरलेल्या विजेचे देयक नियमितपणे भरावे. चोरीची वीज वापरत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल’, असे आवाहन भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी केले आहे.
संपादकीय भूमिका‘वीज’ या राष्ट्रीय संपत्तीची चोरी केल्याप्रकरणी केवळ दंडात्मक कारवाई नव्हे, तर अशांना कारागृहात टाकण्याची शिक्षा केली, तरच कारवाईचा धाक निर्माण होऊन असे कृत्य करण्यास कुणीही धजावणार नाही ! |