कन्हान (नागपूर) येथील हनुमान मंदिरातून पितळ्याच्या गदेची चोरी
|
नागपूर – जिल्ह्यातील कन्हान येथील हनुमान मंदिरातील पितळ्याची गदा एका युवकाने चोरून नेली. ही घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे. चोरी करण्यापूर्वी युवकाने हनुमानाच्या मूर्तीला नमस्कार केला, प्रसाद ग्रहण केला आणि नंतर गदा चोरली. महिनाभरात मंदिरात झालेली चोरीची ही तिसरी घटना आहे. पहिल्या वेळी मंदिरातील हनुमानाचा मुकुट चोरीला गेला होता. ५ ते ६ मासांनी पुन्हा मुकुट आणि कडे चोरीला गेले.