(म्हणे) ‘प्रियकराच्या प्रेमासाठी बुरखा घालीन !’
अभिनेत्री राखी सावंत हिचे विधान !
मुंबई – अभिनेत्री राखी सावंत प्रियकर आदिल खान याच्यासह विवाह करणार आहे. ‘तोकड्या कपड्यांना इस्लाम धर्मात अनुमती नसल्याने अशा गोष्टी टाळणार आहे’, असे तिने सांगितले. ‘आदिलने ‘माझ्या धर्माचा मान ठेवण्यासाठी बळजोरी करणार नाही’, असे सांगितले; पण मी स्वेच्छेने प्रेमासाठी बुरखाही घालीन’, असे राखी म्हणाली. (लक्षावधी मुलींना लव्ह जिहादप्रकरणी बळजोरीने बुरखा घालण्यासारख्या अत्याचारांना सामोरे जावे लागले आहे. राखी यांच्यासारख्या उत्शृंखल अभिनेत्रीला याची संवेदनशीलता काय असणार ? प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अशी विधाने केल्याने लव्ह जिहादसारख्या गंभीर समस्येला बळी पडणार्या मुलींवरील दुःखावर मीठ चोळले जात आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाधर्मांध कधीही अन्य धर्मांचा मान ठेवत नाहीत, हे ठाऊक नसलेल्या राखी सावंत यांना सत्य स्थिती कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असेल ! |