हिंदूंनी स्वार्थाचा त्याग करून हिंदुत्वाचे स्फुलिंग प्रज्वलित केले पाहिजे! – युवराज स्वामी श्री माधवप्रपन्नाचार्यजी महाराज, उज्जैन
उज्जैन (मध्यप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
उज्जैन (मध्यप्रदेश) – हिंदूंना गर्भातूनच सहिष्णुतेचा संस्कार मिळतो आणि हीच सहिष्णुता आज आपल्या गळ्याचा फास बनली आहे. खरे पहाता ज्यांना पंचमहाभूतांचे शरीर मिळालेले आहे, ते सनातन धर्माचे आहे; परंतु काळाच्या प्रभावामुळे ते त्यापासून लांब गेले. आज तेच सनातन धर्माला निधर्मी म्हणून विरोध करत आहेत. अशा वेळी आपल्याला स्वार्थाचा त्याग करून आपल्या मनात हिंदुत्वाचे स्फुलिंग प्रज्वलित केेले पाहिजे. स्वार्थ आणि अहंकार सोडून हिंदूसंघटनाची वज्रमूठ बनवावी लागेल, असे मार्गदर्शन श्री रामानुजकोट मंदिराचे युवराज स्वामी श्री माधवप्रपन्नाचार्यजी महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त येथील कालिदास संस्कृत अकादमीच्या अभिरंग सभागृहामध्ये आयोजित वर्धापन समारंभामध्ये ते मार्गदर्शन करत होते.
प्रारंभी ‘सप्तर्षि गुरुकुल’चे संस्थापक आचार्य श्री. देवकरण शर्मा यांनी त्यांचे आशीर्वचन व्यक्त केले. युवराज स्वामी श्री माधवप्रपन्नाचार्यजी महाराज यांच्या शुभहस्ते हिंदु जनजागृती समितीने प्रकाशित केलेल्या ‘हलाल जिहाद’ या हिंदी भाषेतील ग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी समितीच्या कार्याचा परिचय करून दिला. ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर समितीचे धर्मप्रचारक श्री. श्रीराम काणे यांनी उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी आणि श्री. शिवम् सोनी यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या तारुण्यावस्थेचे साक्षीदार असल्याचा आनंद आहे ! – युवराज स्वामी श्री माधवप्रपन्नाचार्यजी महाराज, उज्जैनहिंदु राष्ट्राची स्थापनेचे दायित्व केवळ समितीचे नसून आपल्या सर्वांचे आहे. हेच कार्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने हिंदु जनजागृती समिती करत आहे. २१ व्या वर्षी अर्थात् तारुण्यावस्थेत समितीच्या पदार्पणाचे आम्ही साक्षीदार आहोत, याचा फार आनंद आहे. |
‘हिंदु जनजागृती समितीमुळे हिंदु राष्ट्र निश्चितपणे येईल’, असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे ! – श्री. अरविंद जैन, हिंदु शौर्य जागरण
हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित रहाण्यापूर्वी ‘आम्ही हिंदुत्वाचे किती कार्य करतो’, असे वाटायचे; परंतु या अधिवेशनाला पूर्वोत्तर भारतातून आलेले हिंदुत्वनिष्ठ किती प्रतिकूल परिस्थितीत कार्य करत आहेत, हे पाहून आपल्याला अजून किती केले पाहिजे, हे लक्षात आले. तसेच प्रारंभी हिंदु राष्ट्राची स्थापना केवळ एक कल्पना वाटत होती; परंतु आज परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मुखातून निघालेला संकल्प सिद्ध होतांना दिसून येत आहे. त्यामुळेच ‘हिंदु राष्ट्र निश्चितपणे साकार होईल’, असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
युवराज स्वामी श्री माधवप्रपन्नाचार्यजी महाराज यांचा परिचयउज्जैन येथील श्री रामानुजकोट मंदिराचे युवराज स्वामी श्री माधवप्रपन्नाचार्यजी महाराज यांना वेद आणि शास्त्र यांनी पारंपरिक अध्ययन करून समाजहितासाठी उपयोगात आणले आहे. या संदर्भात सोरबोन (फ्रान्स) येथील ‘इकोल सुपेरियर रॉबर्ट डी युनिव्हर्सिटी’कडून त्यांना ‘डॉक्टरेट’ची पदवी प्रदान करण्यात आली आहे, तसेच ‘आयआयपीपीटी फाऊंडेशन’कडूनही त्यांना ‘भारत सन्मान’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. |