रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती
‘मी सेवेनिमित्त काही मास रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहात होते. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेला नमस्कार केल्यावर ‘त्यांचा हात डोक्यावर आहे आणि त्यांच्या हातातून देहात चैतन्य जात आहे’, असे जाणवणे
‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील स्वागतकक्षात प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या प्रतिमेला मी प्रतिदिन नमस्कार करते. तेव्हा ‘प.पू. बाबांचा हात माझ्या डोक्यावर आहे. मला त्यांच्या हाताचा स्पर्श होत आहे. त्यांच्या हातातून माझ्या देहात चैतन्य जात आहे आणि प.पू. बाबा मला काहीतरी सांगत आहेत’, असे मला जाणवते.
२. आश्रमात चालत असतांना ‘चैतन्यावरून चालत आहे’, असे जाणवणे
आश्रमात चालत असतांना अधूनमधून ‘मी चैतन्यावरून चालत आहे’, असे मला जाणवते. मला भूमीचा स्पर्श जाणवत नाही. ‘मी नक्की भूमीवरूनच चालत आहे का ?’, याची निश्चिती करण्यासाठी मी मागे वळून पहाते.
३. आश्रमात प्रतिदिन ‘महाप्रसाद ग्रहण करतांना माझ्या संपूर्ण देहात ‘परम पूज्य, परम पूज्य’, असा नामजप ऐकू येतो.’
– सौ. अर्चना सुनील घनवट, पुणे (१७.११.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |