नूपुर शर्मा यांच्यासंदर्भात चर्चा करणार्या भाजयुमोच्या नेत्यावर नोएडा येथे धर्मांधांकडून प्राणघातक आक्रमण !
नोएडा (उत्तरप्रदेश) – येथे भाजपची विद्यार्थी शाखा असलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते अभिषेक सिंह राठोड यांच्यावर धर्मांध मुसलमानांनी प्राणघातक आक्रमण केले. राठोड हे महंमद पैगंबर यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह विधान करणार्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्यासंदर्भात काही लोकांशी चर्चा करत असल्याचा राग धरून त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले. या वेळी आक्रमणकर्त्यांनी ‘सर तन से जुदा’च्या (धडापासून शिर वेगळे करण्याच्या) घोषणा देत आक्रमण केले, अशी माहिती राठोड यांनी ट्वीट करून दिली.
मूळचे बिहारच्या चंपारण येथील अभिषेक सिंह राठोड हे नोएडा सेक्टर ४४ मध्ये एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते. तेथे काही लोक राजकीय सूत्रांवर चर्चा करत असल्याने राठोडही त्यामध्ये सहभागी झाले. त्या वेळी नूपुर शर्मा यांच्यासंदर्भातही विषय झाला. त्यानंतर राठोड हे तेथून निघाले; परंतु काही वेळाने त्यांना मारण्यासाठी अनेक लोक हातात रॉड आणि धारदार शस्त्रे घेऊन आले. त्यांच्यावर मागून आक्रमण केले.
आक्रमणकर्त्यांपैकी दोघांचे नाव अमजद आणि राशिद होते. राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व लोक त्या रेस्टॉरंटमध्येच होते, जिथे नूपुर शर्मा यांच्यासंदर्भात चर्चा झाली. आक्रमण होत असतांना राठोड यांच्या दोन मित्रांनी आक्रमणकर्त्यांपासून त्यांना वाचवले आणि रुग्णालयात भरती केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. नोएडाच्या पोलीस उपायुक्तांनी ‘घटनेची दखल घेऊन आरोपींच्या विरोधात कारवाई केली जाईल’, असे आश्वासनही दिले आहे.
संपादकीय भूमिका
|