सासवड (पुणे) येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरंदर विभाग आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेच्या वतीने दुर्गामाता दौडीचे आयोजन

दुर्गामाता दौडीच्या समारोपाच्या वेळी ३०० हून अधिक हिंदूंचा सहभाग

सासवड (पुणे), ८ ऑक्टोबर (वार्ता.) – पू. भिडेगुरुजी यांच्या प्रेरणेने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पुरंदर विभाग आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री पंडितदादा मोडक यांच्या वतीने सासवड येथे आयोजित करण्यात आलेल्या दुर्गामाता दौडमध्ये सासवड मधील ग्रामस्थांनी, तसेच मोठ्या संख्येने धर्मप्रेमींनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे सर्व पक्ष आणि संघटना यांचे कार्यकर्तेही दुर्गामाता दौडमध्ये सहभागी झाले होते. या वेळी माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे उपस्थित होते. समारोपाच्या वेळी बोलतांना ते म्हणाले की, हिंदूंचे हीत जपणारे शासन आले असून हिंदूंवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल.

समारोपाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती अभियानांतर्गत ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन झाले. या वेळी शिवतिर्थावर हिंदु राष्ट्राची शपथ घेऊन ३०० पेक्षा अधिक धर्मप्रेमींनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत’, असा संकल्प केला.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देव, देश अन् धर्म यांविषयी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी नियमित व्याख्यान आयोजित करावे, असे उपस्थित धर्मप्रेमींनी सांगितले.