संभाजीनगर येथे पोलीस भरतीची सिद्धता करणार्‍या विद्यार्थ्यांचे आंदोलन

(प्रतिकात्मक छायाचित्र)

संभाजीनगर – एन्.सी.सी.च्या (राष्ट्रीय छात्र सेनेच्या) उमेदवारांना पोलीस भरतीत बोनस गुण देण्याविषयी राज्यसरकारने नवीन अध्यादेश काढला आहे. त्या विरोधात विद्यार्थ्यांनी येथील ‘टीव्ही सेंटर’ चौकात आंदोलन केले. ‘एन्.सी.सी.’च्या उमेदवारांना पोलीस भरतीत बोनस गुण दिल्यामुळे इतर मुलांवर अन्याय होतो, तर बोनस गुण देण्यापेक्षा राखीव जागा द्या, त्याला आमचा विरोध नाही’, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. या आंदोलनात ५०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामुळे पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे.