परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालसाधिका कु. श्रिया राजंदेकर (वय ११ वर्षे) हिला आलेली अनुभूती
साधकांना अनुभूतींच्या माध्यमातून आनंद देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
१. श्वास घेतांना ‘थंड हवा आत जात आहे आणि श्वास शुद्ध होत आहे’, असे जाणवणे
‘एकदा मला परात्पर गुरुदेवांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) सत्संग लाभला. तेव्हा त्यांनी साधकांना विचारले, ‘‘सुगंध येत आहे का ?’’ तेव्हा ‘श्वास घेतांना थंड हवा माझ्या आत जात आहे आणि माझा श्वास शुद्ध होत आहे’, असे मला जाणवले. प्रत्यक्षात मी थोडा वेळच ‘सुगंध येत आहे का ?’, याकडे लक्ष दिले, तरीही नंतर पुष्कळ वेळ मला शरिरात थंडावा जाणवत होता.
२. माझे बोलणे ऐकून परात्पर गुरुदेव मला म्हणाले, ‘‘खूप छान ! तुला आलेली ही अनुभूती पंचतत्त्वांच्या पलीकडील आहे.’’
मला ही अनुभूती केवळ ‘परात्पर गुरुदेवांची कृपा आणि त्यांचे अस्तित्व’ यांमुळे आली. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही अल्पच आहे.’
– गुरुदेवांच्या चरणांवरील,
कु. श्रिया राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ११ वर्षे), फोंडा, गोवा. (३.४.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |