एका राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असतांना पोलीस, प्रशासन आणि सरकारी यंत्रणा काय करत होत्या ? हे अतिक्रमण वाढण्यास उत्तरदायी असणार्या सर्वांवर देशद्रोहाबद्दल कठोर कारवाई करणे आवश्यक !
‘बांगलादेशी घुसखोरांनी आसामच्या ६ सहस्र ६५२ चौरस किलोमीटर भूमीवर अतिक्रमण केले आहे. हे क्षेत्रफळ जवळपास २ गोवा राज्ये बसतील एवढे आहे. दरांग जिल्ह्यातील धौलपूर येथे अतिक्रमण करणार्या बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्यासाठी गेलेले अतिक्रमणविरोधी पथक आणि पोलीस यांच्यावर शेकडो धर्मांध आंदोलनकर्त्यांनी आक्रमण केले. या आक्रमणामध्ये २ आक्रमक ठार, तर ११ पोलीस घायाळ झाले होते. या प्रकरणाच्या चौकशीनंतर ही माहिती समोर आली. घुसखोरांनी प्राचीन मंदिरांच्या भूमींवर उघडपणे अतिक्रमण केले आहे. त्यांनी सर्वाधिक अतिक्रमण वैष्णव मठांच्या भूमींवर केले आहे. आसामच्या ४ लाख हेक्टर जंगल क्षेत्रावर बांगलादेशी धर्मांधांनी अतिक्रमण केले आहे. हे राज्याच्या एकूण जंगल क्षेत्राच्या २२ टक्के आहे. एका सरकारी समितीला आढळले की, आसामच्या ३३ जिल्ह्यांमधील १५ जिल्ह्यांमध्ये बांगलादेशी घुसखोर वरचढ ठरले आहेत.’