स्वतः कॉपी (नक्कल) करणारे शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी करण्यापासून कधी रोखतील का ?
‘राजस्थान सरकारच्या शिक्षकांच्या पात्रता परीक्षेत मोठ्या प्रमाणात कॉपी (नक्कल) करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या वेळी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कॉपी करण्याचा प्रयत्न झाला. इंटरनेटच्या माध्यमांतून भ्रमणभाष संचाद्वारे हा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आल्यावर इंटरनेट व्यवस्था बंद करण्यात आली. तरीही प्रशासनाला कॉपीचे प्रकार थांबवता आले नाहीत. कॉपी करण्यासाठी भ्रमणभाष संच, इंटरनेट, ‘ब्लू टूथ’ आदी आधुनिक उपकरणांचा वापर करण्यात आला. ही उपकरणे २५ जणांना दीड कोटी रुपयांना विकण्यात आली.’